आमच्या विषयी थोडस

विचारवेध : विचारवेचे १९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, ‘विचारवेध’ संमेलन आयोजित होत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमी तर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी निरनिराळ्या गावांत, तेथील कार्यकर्त्यांच्या सहयोगाने, हे संमेलन आयोजित करीत. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचारवेध संमेलने पुन्हा सुरु होत आहेत.

भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मुलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वासमावेषक विकास, समता, मैत्रिभाव यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हे विचारवेध मंच हक्काने उपलब्ध आहे.

वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे माध्यम आहे. ‘विचारवेचे’ ही छोटी भाषणे सर्वांना सहज उपलब्ध आहेत. ‘विचारवेचे’ ऐका, इतरांना सांगा आणि चार्चांमध्ये उत्साहाने भाग घ्या