आवाहन

आवाहन

विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार यांचे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आज गरज आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मुलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वासमावेषक विकास, समता, मैत्रिभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मुलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हे विचारवेध मंच हक्काने उपलब्ध आहे.

विविध विचारांची संयत अभिव्यक्त्ती आणि सर्जनशील वैचारिक संवाद ही विचारावेधाची कार्यप्रणाली आहे.

माहिती नभोमंडळाचा वापर ज्ञानप्रसारासाठी करणे हा कमी खर्चात खूप लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचण्याचा मार्ग आहे. गेली दोन वर्षे विचारवेध हा मार्ग यशस्वीपणे चोखाळत आहे. विविध सामाजिक विषयांवर छोटे व्हिडीओ तयार करून ते यू ट्यूब वर सर्वाना पहाण्यासाठी, त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी प्रकाशित केले जात आहेत. आज मितीला असे १३५ (एकशे पस्तीस) व्हिडीओ प्रकाशित झाले आहेत. माहिती नभोमंडळावर YouTube मध्ये जाऊन  तिथल्या शोध खिडकीत  vicharvedh ( note ‘v’) असे लिहिल्यास हे १३५ व्हिडीओ सहज आणि विनामूल्य उपलब्द्ध होतात; वडगाव ते वॅाशिन्गटन – कोठूनही पाहता येतात, पाहिले जात आहेत.! आत्ता पर्यंत १,३८,००० जिज्ञासूंनी हे विचारावेचे पहिले आहेत, ऐकले आहेत.

विचारवेध प्रकाशित विचारावेच्यांची यादी सोबत जोडली आहे.

हा उपक्रम अधिक नेटाने पुढे नेण्याचा विचारावेधचा संकल्प आहे. त्यासाठी तुमचा हातभार आवश्यक आहे. त्यात तुमचाही फायदा आहे, अशी योजना आम्ही बनवली आहे.

आपण यूट्यूब वरचा एक विचारावेचा पुरस्कृत करावा. भाषणाच्या शेवटी पुरस्कारकर्त्याचे नाव, पुरस्कारकर्त्यांने सुचवलेल्या एका व्यक्त्तीचे नाव, दोघांचही एका ओळीत ओळख आणि  एक फोटो अशी पूर्ण स्क्रीन भरून असलेली माहिती दिसेल. ही माहिती पुढील पन्नास ( की शंभर) वर्षे जगभरचे जिज्ञासू बघतील.  सध्या उपलब्द्ध असलेल्या दुसऱ्या कोठल्याही माध्यमात, उदाहरणार्थ, बागेतील बाकावर किंवा हॉस्पिटलच्या खाटेवर पुरस्कारकर्त्याच्या नावाची लावलेली पाटी, बघणाऱ्याला पुरस्कारकर्त्यांच्या नावाशिवाय काहीही माहिती सांगत नाही.

चांगल्या सामाजशिक्षणाच्या कामाला हातभार आणि त्याचबरोबर उत्तम ठिकाणी कायम स्वरूपी माहितीपूर्ण स्मारक अशी ही विशेष  योजना आहे.

यूट्यूब वरचा एक विचारावेचा पुरस्कृत करायचा खर्च :

पूर्ण स्क्रीन साठी रुपये २०,०००/- (रुपये वीस हजार)                                                                                                                                    अर्ध्या (१/२ )स्क्रीन साठी रुपये १२,०००/- (रुपये बारा हजार)

विचारवेध असोसिएश ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणारी नोंदणीकृत संघटना आहे.  विचारवेध असोसिएशन शासकीय किंवा परदेशी संस्थांकडून मदत घेत नाही. एक लाखापेक्षा जास्त रकमेची देणगी एका व्यक्तीकडून घेत नाही.                       विचारवेध पारदर्शक, निरपेक्ष व लोकशाही मार्गाने चालण्यासाठी आपली मदत अमूल्य आहे!

धन्यवाद!

VICHARVEDH ASSOCIATION

www.vicharvedh.org

www.facebook.com/vicharvedh

F2, 501, SUCCESS TOWER, STATE BANK NGR, HSG. SOC. S.NO.37/2, PASHAN, PUNE, , 411008

CIN:U80301PN2017 NPL173531

PAN:AAGCV1817K

TAN:PNEV14404F

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *